Friday, August 3, 2018

गाव ...! A village life

मित्रांनो नमस्कार!

आज पुन्हा एकदा लिहावेसे वाटले.
पण, कुठल्या मुद्यावर लिहावे, तेच कळेना. असाच विचार मनात सारखा तग धरुन बसला होता. तेवढ्यात मित्रांसोबत गप्पा मारताना मित्रांनीच विषय काढला. तो म्हणजे “आपलं गाव”. तेव्हाच वाटले, गावच्या राहनिवरच लिहाव. नाही का?
विषय तर “लई झ्याक” आहे. आता म्हणाल, “लई झ्याक” हे काय?

हो, गावा बद्दल लिहायचे म्हणजे थोडी फार, गावची भाषा पण हविच ना! कदाचित, हें दोन शब्द वाचल्यावर, तुमच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आलेच असेल.

हा लेख लिहायचं कारण असे की, नोकरी साठी गावची बरीच लोकं शहरात राहतात. त्यातला मी एक. इथे राहताना मात्र क्षणा-क्षणाला गावंची आठवण ही येतेचं. गावात राहणार्यांना वाटते शहरात राहने म्हणजे खूपच मोठे. पण खरे सांगू, शहरात राहणे म्हणजे, स्वतः हरवून बसने. शहरात फक्त पैसा मिळतो. बाकी सर्व काही येतं, ते गावातूनच.

तर कसं, आपलं गाव लइ झ्याक हाय! 😃😃...

आता, मूळ विषयावर यावं म्हणतो!

गाव - हे एक खूप मोठं कुटुंब आहे. इथेच, या गावात तुम्हाला सर्वकाही पाहायला मिळते. गाव पूर्ण रंगरंगोटी ने भरलेला असतो. आजही गावातील लोकांची सुरुवात कोंबडा अरवला की होते. गावच्या लोकांना लवकर उठुन रानात जायची खूप गडबड असते. असणार तर! शेत - रान यावर खूप लक्ष्य द्यावे लागतं. खरे म्हणजेे खूप कष्ट असतात रानात.
तेव्हा कुठेतरी आपल्या सर्वांना खायला अन्न मिळते. पण त्यासाठी एकच माणूस कष्ट करतो. आणि तो म्हणजे “शेतकरी”.

Village life, indian villages, marathi people, gav, village farm, sheti, school days, usache bharlele tractor

सकाळी सकाळी उठून रानात जाणे खूपच छान वाटते. तो हिरवा निसर्ग, झाडे-झुडपे, किलबिल करणारे पक्षी, सकाळचं कोवळं ऊन. यामुळे शेतकरी खूप सदृढ असतो. आणि त्यात रानात कष्ट करणे ते वेगळंच.  नाही म्हणजे, गावात राहिले कीे वेगळा असा व्यायाम करण्याची आवश्यकता फार कामी.




Village life, indian villages, marathi people, gav, village farm, sheti, school days,
माझे बालपण मला अजूनही आठवते. तो डाव मांडणे, खेळणे, भांडणे खूप मजा यायची. तुम्हाला आठवतं का हो? सायकलचं चाक घ्यायचं आणि गावभर हुंदडायचो. उसाचा ट्रॅक्टर आला रे आला, की त्याच्यामागे ऊस काडत शाळेतील निम्मी पोरं पळायची. आता आपण उसाचा रस पितो, पण ऊस काडून तोंडाने खाण्याची मजा काय निराळीच आहे. आठवत असेल ना तुम्हाला, तो शाळेचा पांढरा शर्ट आणि खाकी चड्डी. प्रार्थनेला उभारलं की एकमेकांना ढकलणे, पुढच्या पोराचा शर्ट लिहून घाण करणे. घंटा वाजली की पळत सुटणे. किती मस्त दिवस होते.

आजही आठवते की आपण खाऊ घेण्यास  चार अणे, आठ आणे घेऊन यायचो.
हसू येतं ना. मलाही.
जरासा उन्हाळा चालू झाला, की सगळी पोरं विहिरीवर. इर्षेवर पोरं विहिरीचा गाळ शिवून यायची. पाक टोकावरून उड्या ठोकायची.

एकदा तर गंमतच झाली. मी, माझा भाऊ आणि सवंगडी विहिरीवर पोहायला गेलतो. बाजूलाच एक आंब्याचं झाड व्हतं.     आम्ब नुसता लकडली व्हती. मग विचार कसला. घेतली दगडं रानातली आणि लइ आम्ब पाडली.



तेवढ्यात, तिकडून आवाज आला. आरं आरं थांब. बघतो तर काय, राणाचा मालक काठी घेऊन आमच्याच कडे येत व्हता. आता काय, सगळेच पोरं पळ्त अशी सुटली की जणू मागे काय वाघच लागला आहे. पण तो धिप्पाड माणूस काही वाघापेक्षा कमी नव्हता. त्यात आम्ही टुकार पोरं! आम्ही कशाला ऎकतोय. काढलेले आंबे टाकून पळत सुटलो, तेही पाणी पाजलेल्या उसातून, खोलवर पाय रूतवत. धापा टाकत. काय मजा होती हे सगळे करण्यात.


हे सगळं आठवलं की वाटतं, द्यावं सगळं सोडून आणि जाऊ गावाकडे.
जाऊ रानात जांभळं तोडू, चिंचा पडू, मस्त मित्रांसोबत
बसू कट्यावर एकमेकांना खिजवत, चिडवत.
अजूनही, तो आमचा दररोजचा कट्टा आठवतो. जेवन झालं की सगळी आम्ही गल्लीतली पोरं तिकडेच. तिथे whatsapp पेक्षा लवकर गावातल्या घडामोडी कळायच्या. आठवत असतील ना तुम्हाला तुमचे कट्यावरचे मिञ. रात्रीची शेकोटी करून बसलेले.

ते वेगवेगळे गावठी खेळ अजूनही खेळावेशे वाटतात. भौरा, गोट्या, विठी दांडू, गलोरी, लपंडाव, कुस्ती, खो-खो, अजून बरीच. किती मस्त मैदानी खेळ होते ते. लहानपणी हेच खेळ खेळल्यामुळे वातावरणात थोडा फार फरकाने शरीराला कसलीच इजा होत नाही.



पण आत्ताच्या पिढीला, हवा पाणी जरा बदलले की लगेच सर्दी, ताप, खोकला असतोच. हे सगळे, मातीचा संबंध कमी झाल्यामुळे होते. म्हणून गाव निराळेच आहे.


गावातील वैशिष्ट्य म्हणजे सगळीच लोकं एकमेकांना ओळखत असतात. प्रत्येकाच्या घरी उठणं बसणं असत.


घरात कुठला तरी नवीन पदार्थ बनला ली लगेच थोडे शेजारी दिले जाते. गावात काहीही होउदे, पूर्ण गाव जमा होतो मदत करायला. आजही मी गावी गेलो की मला ऐकन्यास खूप बरे वाटते की “अरे बाळ कदि आलास, बरा आहेस ना? मी म्हणतो “हो काका बरा आहे मी, तुम्ही कसे आहात?” किती आपुलकी आहे गावात. नाही का?

पण हे सगळे शहरात पहायला देखील मिळत नाही. दूरवर जाऊदे आपल्या शेजारी कोण राहतो हे आपल्याला माहीत नसते. मदत.. ती तर खूपच लांबची गोष्ट. या कामामुळे बरीचं लोकं आपले राहणीमान, आपलं मूळ विसरत आहेत. शरीर दिवसेंदिवस नाजूक होत चालले आहे. आपली माणसे आपण मागे ठेवून जात आहोत.  आपल्या सवंगद्याना विसरत चालतोय आपण.

हा हिरवा निसर्ग, स्वछ हवा,
मिळणार नाही कुठे,
गावंच आहे एकमेव ठिकाण,
तिथे तुम्हाला मिळेल स्फूर्ती छान!
म्हणून गाव हे सर्व आहे,
आपला मूळ, आपला जन्म "गाव" आहे!

गावात आहे आपुलकी,
खूप प्रेम खूप नाती,
सर्व येई मदती,
जेव्हा संकट येई,
म्हणून गाव हे सर्व आहे,
आपला मूळ, आपला जन्म "गाव" आहे!

  • - प्रशांत सुरेश देवमोरे.

Latest article

What are the pros and cons of web hosting companies in Marathi?

2019 मध्ये सर्वोत्कृष्ट वेब होस्टिंग सुविधा कोणती कंपनी देते? जगभरातील सर्वोत्तम वेब होस्टिंग कंपन्यांची  तपशीलवार माहिती आणि त्यांचे फा...