Showing posts with label marathi kavita. Show all posts
Showing posts with label marathi kavita. Show all posts

Sunday, May 19, 2019

Bhet ...! Marathi Poem in 2019

वर्षांनी खूप भेटण्यास तुला ,
मन आतुरतेने वाट पाहते,
देखने दिसण्यास आणि तुझ्या हृदयात बसण्यास मात्र,
मन जुळवा जुळव करू पाहते....।

Love, marathi stories, marathi poem, marathi literature, prashant devmore,shabd mhanje sarv kahi, bhet kavita, prem kavita,

हे माझे प्रेमाचे बोल ऐकून ती म्हणाली,

तुझा माझा सहवास,
 जसा अत्तराचा वास,
दूर राहणे तुझ्याविना,
जसा मासा पाण्याविणा...।

मी म्हटले,

तुझ्या सहवासातले ते गोड दिवस,
निघून गेले सर सर,
 आठवण येताच  मात्र,
डोळ्यातून अश्रू येतात झर झर...!

- प्रशांत सुरेश देवमोरे 

Wednesday, May 15, 2019

विरह


विरह 

धाडस होत नाही माझं
तूच आता करून टाक,
आयुष्यातील मोठा निर्णय,
तूच आधी घेऊन टाक.... !

virah, prem, virah kavita, prem kavita, prem virah kavita, marathi virah kavita, breakup marathi kavita, marathi kavita on virah, marathi kavita

त्यातूनही वाट पाहीन मी,
तुझं माझं जुळवू पाहीन मी,
पण तू नको थांबू आता,
निर्णय आधी घेऊन टाक.... !

निघून जाशील दूर तू,
जीव माझा मुठीत घेऊन,
हरवून बसेन मी स्वतःला,
तुला माझ्या मनात घेऊन.... !

मी, मी नसेन तेव्हा,
फक्त आत्म्याविना शरीर असेल ,
ओढ़ तर तुझ्याकडे असेल,
मी फक्त तुझ्या विरहात गुरफटलेलाअसेल ,

मी फक्त तुझ्या विरहात गुरफटलेला असेल .... !

Triple Camera Smartphone providers in 2019


Wednesday, October 3, 2018

वेडं प्रेम...

।...वेडं प्रेम...।

मनात तू , 
कल्पनेत तू , 
वाऱ्याच्या मंद स्पर्शात तू,
मग का वेगळी झालीस ग तू...!

सुखात तू दुखत तू,
माझ्या वेड्या मनाचा ध्यास तू,
माझ्या प्रेमवेड्या हृदयातील धक धक तू,
इतके असून पण का वेगळी झालीस तू...!

अंतःकरण तुटले माझे,
तीळ तीळ मन जळले  माझे,
आता काही उरले नाही,
जवळ तू राहिली नाही...!

काय करावे कळेना आता
कोणाशी काय बोलावे,
उमजेना आता,

खरच काही कळत नाही,
का डाव मोडलिस तू,
जोड जमायच्या आदी,
मनाला माझ्या विरहात टाकलीस तू...

खरेच, हेच होते का ग प्रेम,
याच साठी दिलास का वेळ,
गेलीस तू सोडून,
नातं सगळे तोडून...!

पण आठवण तर येतच राहील,
मनाच्या कोपर्यात, हृदयाच्या कप्प्यात,
तुझी जागा तशीच राहील...!

...प्रशांत सुरेश देवमोरे…!


आठवण...

marathi kavita, prashant devmore, poem on athvan, prem kavita, shabd mhnaje sarv kahi, athvanichya sagara
नुसती  आठवण जवळ ठेऊन,
त्रास सहायला, नाही मला नाही झेपत…!

काही गौम्य नसतानाही,
वेळ खर्च करण्यात,
मला नाही पटत…!

हेही माहीत आहे,
आठवणी काढल्या तर,
क्षण किती सुंदर होते...
पण,
त्या सुंदर आठवणींच्या परिकल्पना जोपासणे
हेही नाही झेपत…!

शेवटी आठवण ही आपलीच असली,
तरीही, ती सत्य बनून पुढे येणार्यातली नाही,
म्हणून, त्यात मौल्यवान असा काळ हातातून गमालयास,
माझ्या व्यवहार ज्ञानाला झेपत नाही…!

खरे आहे सगळे,
खूप छान होता वेळ,
त्यात तुझ्या गोड सहवासाने,
खेळला होता खूप खेळ…!

पण तो होता …
आणि ….आता तो नाही,
तो परत मिळवण्यासाठी,
अर्थ व प्रयत्न लागले कमी,
का आणि कसे,
कळेना काही,

आता ह्या मैदान मोकळ्या आयुष्यात,
प्रेम तर राहिल मनातच ...

पण मैदान सोडणे,
आपल्या जन्मदात्याला खपणारे नाही,
आपण असतानाही त्यांच्या नयनी अश्रु देखील शोभणारे नाहीत,

म्हणून...जीवनाचा हा गाडा न्यायचा आहे शेवटपर्यंत,
प्रेम होते आणि ते राहील ही ,
पण सहवास राहणार नाही शेवटपर्यंत,

राहतील त्या फक्त आठवनी….

म्हणून म्हणतो,
सारखी आठवन काडू नकोस,
त्रास मनाला देऊ नकोस,

पुढे चालत राहा तू,
तुझेही आयुष्य जगत राहा तू,
नवीन उमेद, नवी स्वप्ने पाहत राहा तू,

कुठे ना कुठे तरी होईलच टक्कर,
तेव्हा, ठरवू आठवणींचे हे चक्कर...
विचारू जाब एकमेकांना,
आठवनीत हरपणे छान होते,
कि प्रेम मनी असने छान होते,

...प्रशांत सुरेश देवमोरे…!

आठवणीच्या सागरा....Athavanichya Sagara Marathi Poem in 2019

आठवणीच्या सागरा....

असा का छळतोस मला,
बनून लाटा,
का आपट्टतोस किनाऱ्यावर माझ्या....

marathi kavita, marathi poem, athavn, prem, samudra, poem on sea, Marathi poem on sea, manatalya gosti, man, divas ratr

एका पाठोपाठ एक,
आठवण करून देतोस,
मनाची प्रत्येक जखम,
ताजी करून जातोस....

दिवस रात्र हा खेळ,
असाच चालू ठेवतोस, 
मनाला माझ्या हसून आणि रडूऊन सुद्धा जातोस....

भरती ओहोटी सोबत,
ऊन साउली ची आठवण करून देतोस
तुझ्याशिवाय अपूर्ण असल्याची जाणीव करून देतोस....

- सुरभी जालंदर देवमोरे

सह्याद्री पर्वतरांग...sahyadri Parvat...


Sahyadri Parvat

सौंदर्य वाढवत तिचे , 
ढग पांघरतो शाल.....
बरसुन पाऊस, 
या धरणीला करतो थंडगार..... 

निसर्गाला साथ ह्या, 
प्राणी पण देतात......
नाचून फुलवून पिसारा, 
शोभा खुप वाढवतात.... 

बघून असा सुंदर नजराणा, 
डोळे तुप्त होतात..... 
निसर्गाचा हा ठेवा, 
ह्दयात साठवून ठेवतात.....

 उंच आहे इतका,
की आभाळ ठेंगण वाटतं.....
नेसून हिरवा शालू,
मनी उत्कर्ष वाढवतं.....

जागोजागी वसल्या आहेत पानसऱ्या,
मोठा तो धबधबा....
घर आहे हे खूपशा प्राण्यांचे,
म्हणून वाघ-सिंहाचा असतो इथे दबदबा....

कडे-कपारी आणि अगडबंब दगड,
ठेवतात त्याचा मान....
नाव आहे त्याच,
सह्याद्री पर्वतरांग....

-सुरभी जालंदर देवमोरे...

Sunday, July 15, 2018

पर्यावरण

पर्यावरण

हे तर सर्वांनीच ऐकले असेल. आपला खरा मित्र, निसर्ग जो आपल्यास जगण्यासाठी भरपूर मदत करतो.


मी तर म्हणतो पर्यावरण म्हणजे ‘परीचे आवरण’. हो असेच वाटते मला. हा हिरवागार परिसर, वेगवेगळ्या रंगांनी भरलेला आहे. पाने, फुले, पक्षी, झाडे, प्राणी, नदी, तलाव, धबधबा आणि भरपूर काही. हे काही एका, परिपेक्षा कमी नाही.
Save trees and save water...!


हे हिरवी झाडे, रंगबिरंगी फुले आणि छाती पुढे टाकून, तटस्थ उभा असणारा तो डोंगर,  वेगवेगळे ऋतू, रिमझिम पाऊस, धुंद होऊन पिसारा फुलवून नाचणारा मोर; ही वाऱ्याची मंद झुळूक,त्यावर डोलणारी झाडे…! हे सगळे दृश्य एकदम मन प्रफुल्लित करते, नाही का? म्हणून मी म्हणतो आपल्या सभोवताली परीचे आवरण आहे म्हणून “पर्यावरण”.



किती छान असतो हा पावसाळा. थेंब थेंब पडतो, पण सगळ्यांना, जुन्या आठवनी कडे घेऊन जातो. आजही भरपूर लोक पाऊस पडला की मस्त गरम गरम भाजी खातात. पाऊस पडताना भजी खाण्याची मजा काही अगळीकच.


पृथ्वी बनवणार्याने किती छान असा निसर्ग बनवला आहे. सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करून आवश्यक असे सर्व काही निर्माण केले आहे. आपल्या जगण्यासाठी सर्व मदत हा निसर्ग करतो. जसे की हवा, पाणी, अन्न हे सर्व काही आपण या निसर्गाकडून घेतो. पण परतफेड म्हणून आपण काय देतो. किंबहुना, हे जणून घ्या, की आपण या पर्यावरणाला परत देण्याइतपत मोठे नाही!


फक्त काळजी घेऊ शकतो. तेही आपण नाही करत. इतका मोठा निसर्ग, मनाने पण खूप श्रीमंत आहे. तो आपल्या कडे मागतही काहीच नाही. फक्त इतकेच सांगतो की, काळजी घ्या.

पण, आपण काय करतो …. विध्वंस, ऱ्हास या सगळ्याचा.


जरा विचार करा, आपली जरा प्रकृती बिघडली की लगेच वैद्यकीय उपचार घेतो. हा निसर्ग कोणाकडे जाणार. त्याचा वैद्य कोण? कोण करणार उपचार या पृथ्वीवर वसलेल्या निसर्गाचे? पडला ना प्रश्न!


आपण, स्वतः चांगले दिसण्यासाठी बरेचकाही करतो, भरपूर पैसेही खर्च करतो. पण जो आपल्याला अन्न, पाणी, हवा या जीवनावश्यक गोष्टी देतो, आपण त्याची काळजीच घेतं नाही. आपले आई वडील आपली काळजी घेतात, प्रियकर प्रेयसीची काळजी घेतो, नोकरदार आपल्या मालकाची काळजी घेतात, पण कोणच या निसर्गाची कदर करत नाही. जितके याला लुटता येईल तेवढा लुटतो. आजचा माणूस किती स्वार्थी आहे हो…! हो ना?


जरा विचार करा, निसर्ग प्रदूषित होत चालला आहे, हवा पाणी दूषित होत आहे, रोगराई वाढत आहे, समुद्राची पाण्याची पातळी वाढत आह.

आपण हा दूषित निसर्ग आपल्या येणाऱ्या पिढीला देणार आहोत का? कदाचित येणाऱ्या या प्रदूषनामुळे पुढची पिढी अपंगच या दुनियेत येतील. त्यांच्यासाठी, हा खरेच केवळ त्यांच्यासाठीच आपणास काळजी घ्यावी लागेल… या निसर्गाची, प्रेयसी प्रमाणे प्रेम करावे लागेल, या मुक्या निसर्गावर… तेही तात्काळ, या क्षणापासून. कदाचित येणाऱ्या पिढीला हा निराळा, निसर्ग बागायला मिळणार ही नाही.


मित्रानो जागे व्हा, अजूनही वेळ गेलेली नाही. येणाऱ्या काळात आपण सदृढ राहणार असाल तर आता आपल्याला निसर्गाची मदत करावी लागेल, थोडा वेळ द्यावा लागेल. नाहीतर, तुम्हाला माहीतच आहे, निसर्ग खवळला की तो कुणालाही सोडत नाही! तो कुणाचा धर्मही पाहत नाही. तो फक्त संपवून टाकतो. तेही एका क्षणार्धात!


त्यासाठी, प्रदूषण करणाऱ्या गोष्टी वापरू नका, झाडे लावा - हवा स्वच्छ होईल, पुरापासून सवरक्षण मिळेल, पाणी जिरवा - भुतालची पाण्याची पातळी वाढेल, जमीन थंड राहण्यास मदत होईल.


आता आला आहे पावसाळा,
धरा ध्यास मनाला,
एक संग व्हा आता,
झाडे लावा आणि पाणी जिरवा,
मदत होईल निसर्गाला,
निसर्गही परतफेड करील आपल्याला...।

असे हे रंगबिरंगी जग,
नाही भेटणार दुसरे,
निसर्ग सौंदर्य परत मिळवण्यासाठी,
गरज आहे सध्या एकजुटीची,
मदत होईल निसर्गाला,
निसर्गही परतफेड करील आपल्याला...।


प्रशांत सुरेश देवमोरे

  • जर लेख आवडला असेल तर मित्रानो subscribe करा...



Latest article

पपीता पत्ती का रस: डेंगू के इलाज में एक प्राकृतिक उपाय

पपीता पत्ती का रस: डेंगू के इलाज में एक प्राकृतिक उपाय पपीता पत्ती परिचय डेंगू बुखार, मच्छरों से फैलने वाली एक खतरनाक बीमारी है, जिससे कई...