Wednesday, October 3, 2018

सह्याद्री पर्वतरांग...sahyadri Parvat...


Sahyadri Parvat

सौंदर्य वाढवत तिचे , 
ढग पांघरतो शाल.....
बरसुन पाऊस, 
या धरणीला करतो थंडगार..... 

निसर्गाला साथ ह्या, 
प्राणी पण देतात......
नाचून फुलवून पिसारा, 
शोभा खुप वाढवतात.... 

बघून असा सुंदर नजराणा, 
डोळे तुप्त होतात..... 
निसर्गाचा हा ठेवा, 
ह्दयात साठवून ठेवतात.....

 उंच आहे इतका,
की आभाळ ठेंगण वाटतं.....
नेसून हिरवा शालू,
मनी उत्कर्ष वाढवतं.....

जागोजागी वसल्या आहेत पानसऱ्या,
मोठा तो धबधबा....
घर आहे हे खूपशा प्राण्यांचे,
म्हणून वाघ-सिंहाचा असतो इथे दबदबा....

कडे-कपारी आणि अगडबंब दगड,
ठेवतात त्याचा मान....
नाव आहे त्याच,
सह्याद्री पर्वतरांग....

-सुरभी जालंदर देवमोरे...

No comments:

Post a Comment

Latest article

What are the pros and cons of web hosting companies in Marathi?

2019 मध्ये सर्वोत्कृष्ट वेब होस्टिंग सुविधा कोणती कंपनी देते? जगभरातील सर्वोत्तम वेब होस्टिंग कंपन्यांची  तपशीलवार माहिती आणि त्यांचे फा...