Saturday, March 2, 2019

Kolhapuri Misal Pav in Mambai...।

Kolhapuri Misal Pav in Mumbai...!

मंडळी नमस्कार,
परवाच मी अस्सल चटकदार अशी मिस्सळ पाव खाल्ला . खाताच मला कोल्हापूरची तिखट, चटकदार मिस्सळ खाल्ल्यासारखे वाटले.

झाल असं, की मित्राच्या लग्नासाठी पनवेल ला गेलो होतो, भूक खूप लागली होती, पण सगळीकडे ईडली-सांबर, उत्तापा, डोसा हेच पदार्थ होते. पण चमचमीत चटकदार अशी मिसळ (Misal Pav) मात्र मिळत नव्हती. कसं जिभेला चवीचा चटका बसला पाहिजे.

खूप खूप शोधून, आजूबाजूच्या माणसांना विचारून मिस्सळ  असलेल्या हॉटेल चा पत्ता भेटला आणि ते म्हणजे हॉटेल बल्लाळेश्वर, नवीन पनवेल, सेक्टर 15.

तावातावाने मिस्सळ मागवली. मिस्सळ बघताच जिभेला पाणी सुटले, कारण तो तिखट रस्याचा कट बघूनच समजले "लै झ्याक मिस्सळ असणार".
kolhapuri misal, misal pav, continental food, misal pav recipe, marathi story, marathi latest article

लगबगीने कांदा लिंबू मिसळला आणि एक घास घेतला. काय सांगू, अस वाटलं, की मी आता कोल्हापुरातच आहे. कारण, असली तिखट मिस्सळ कोल्हापुरातच मिळते म्हणा.
kolhapuri misal, misal pav, continental food, misal pav recipe, marathi story, marathi latest article

पण जबरदस्त... ती मिस्सळ एक नंबर होती. बाकीचे पण पदार्थ खाल्ले, सगळेच 1 नंबर ...जसे की, मूग वडे, गवती चहा...। सगळं कसं लै झ्याक झालं...।

हे सोडून अजूनही वेगळे पदार्थ जे बऱ्याच ठिकाणी मिळत नाहीत, तेही इथे मिळतात. जसे की,
मटकी भेळ,
कढीवडा पाव,

जबरदस्त.... मि तर म्हणतो, खास मिस्सळ पाव खाण्यासाठी पनवेल ला जवावं.

हे चटकदार हॉटेल प्रथमेष आणि अक्षय अशे दोघे जण चालवतात,
पत्ता,
शॉप नंबर 14, प्लॉट नंबर 20, सेक्टर 15ए, साई आरकेड, नवीन पनवेल.
8898662961
9152600540
रेल्वे स्टेशन पासून एकदम जवळ...
आवश्य भेट द्या. इथली चव काय निराळीच आहे....

Latest article

पपीता पत्ती का रस: डेंगू के इलाज में एक प्राकृतिक उपाय

पपीता पत्ती का रस: डेंगू के इलाज में एक प्राकृतिक उपाय पपीता पत्ती परिचय डेंगू बुखार, मच्छरों से फैलने वाली एक खतरनाक बीमारी है, जिससे कई...