Sunday, July 15, 2018

पर्यावरण

पर्यावरण

हे तर सर्वांनीच ऐकले असेल. आपला खरा मित्र, निसर्ग जो आपल्यास जगण्यासाठी भरपूर मदत करतो.


मी तर म्हणतो पर्यावरण म्हणजे ‘परीचे आवरण’. हो असेच वाटते मला. हा हिरवागार परिसर, वेगवेगळ्या रंगांनी भरलेला आहे. पाने, फुले, पक्षी, झाडे, प्राणी, नदी, तलाव, धबधबा आणि भरपूर काही. हे काही एका, परिपेक्षा कमी नाही.
Save trees and save water...!


हे हिरवी झाडे, रंगबिरंगी फुले आणि छाती पुढे टाकून, तटस्थ उभा असणारा तो डोंगर,  वेगवेगळे ऋतू, रिमझिम पाऊस, धुंद होऊन पिसारा फुलवून नाचणारा मोर; ही वाऱ्याची मंद झुळूक,त्यावर डोलणारी झाडे…! हे सगळे दृश्य एकदम मन प्रफुल्लित करते, नाही का? म्हणून मी म्हणतो आपल्या सभोवताली परीचे आवरण आहे म्हणून “पर्यावरण”.



किती छान असतो हा पावसाळा. थेंब थेंब पडतो, पण सगळ्यांना, जुन्या आठवनी कडे घेऊन जातो. आजही भरपूर लोक पाऊस पडला की मस्त गरम गरम भाजी खातात. पाऊस पडताना भजी खाण्याची मजा काही अगळीकच.


पृथ्वी बनवणार्याने किती छान असा निसर्ग बनवला आहे. सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करून आवश्यक असे सर्व काही निर्माण केले आहे. आपल्या जगण्यासाठी सर्व मदत हा निसर्ग करतो. जसे की हवा, पाणी, अन्न हे सर्व काही आपण या निसर्गाकडून घेतो. पण परतफेड म्हणून आपण काय देतो. किंबहुना, हे जणून घ्या, की आपण या पर्यावरणाला परत देण्याइतपत मोठे नाही!


फक्त काळजी घेऊ शकतो. तेही आपण नाही करत. इतका मोठा निसर्ग, मनाने पण खूप श्रीमंत आहे. तो आपल्या कडे मागतही काहीच नाही. फक्त इतकेच सांगतो की, काळजी घ्या.

पण, आपण काय करतो …. विध्वंस, ऱ्हास या सगळ्याचा.


जरा विचार करा, आपली जरा प्रकृती बिघडली की लगेच वैद्यकीय उपचार घेतो. हा निसर्ग कोणाकडे जाणार. त्याचा वैद्य कोण? कोण करणार उपचार या पृथ्वीवर वसलेल्या निसर्गाचे? पडला ना प्रश्न!


आपण, स्वतः चांगले दिसण्यासाठी बरेचकाही करतो, भरपूर पैसेही खर्च करतो. पण जो आपल्याला अन्न, पाणी, हवा या जीवनावश्यक गोष्टी देतो, आपण त्याची काळजीच घेतं नाही. आपले आई वडील आपली काळजी घेतात, प्रियकर प्रेयसीची काळजी घेतो, नोकरदार आपल्या मालकाची काळजी घेतात, पण कोणच या निसर्गाची कदर करत नाही. जितके याला लुटता येईल तेवढा लुटतो. आजचा माणूस किती स्वार्थी आहे हो…! हो ना?


जरा विचार करा, निसर्ग प्रदूषित होत चालला आहे, हवा पाणी दूषित होत आहे, रोगराई वाढत आहे, समुद्राची पाण्याची पातळी वाढत आह.

आपण हा दूषित निसर्ग आपल्या येणाऱ्या पिढीला देणार आहोत का? कदाचित येणाऱ्या या प्रदूषनामुळे पुढची पिढी अपंगच या दुनियेत येतील. त्यांच्यासाठी, हा खरेच केवळ त्यांच्यासाठीच आपणास काळजी घ्यावी लागेल… या निसर्गाची, प्रेयसी प्रमाणे प्रेम करावे लागेल, या मुक्या निसर्गावर… तेही तात्काळ, या क्षणापासून. कदाचित येणाऱ्या पिढीला हा निराळा, निसर्ग बागायला मिळणार ही नाही.


मित्रानो जागे व्हा, अजूनही वेळ गेलेली नाही. येणाऱ्या काळात आपण सदृढ राहणार असाल तर आता आपल्याला निसर्गाची मदत करावी लागेल, थोडा वेळ द्यावा लागेल. नाहीतर, तुम्हाला माहीतच आहे, निसर्ग खवळला की तो कुणालाही सोडत नाही! तो कुणाचा धर्मही पाहत नाही. तो फक्त संपवून टाकतो. तेही एका क्षणार्धात!


त्यासाठी, प्रदूषण करणाऱ्या गोष्टी वापरू नका, झाडे लावा - हवा स्वच्छ होईल, पुरापासून सवरक्षण मिळेल, पाणी जिरवा - भुतालची पाण्याची पातळी वाढेल, जमीन थंड राहण्यास मदत होईल.


आता आला आहे पावसाळा,
धरा ध्यास मनाला,
एक संग व्हा आता,
झाडे लावा आणि पाणी जिरवा,
मदत होईल निसर्गाला,
निसर्गही परतफेड करील आपल्याला...।

असे हे रंगबिरंगी जग,
नाही भेटणार दुसरे,
निसर्ग सौंदर्य परत मिळवण्यासाठी,
गरज आहे सध्या एकजुटीची,
मदत होईल निसर्गाला,
निसर्गही परतफेड करील आपल्याला...।


प्रशांत सुरेश देवमोरे

  • जर लेख आवडला असेल तर मित्रानो subscribe करा...



Friday, February 23, 2018

एक सुंदर पहाट

एक सुंदर पहाट

नमस्कार मित्रांनो…!

मी प्रशांत. परवाच मी पहाटेचा प्रवास करीत होतो. तेव्हा अनुभवलेल्या गोष्टी मी तुम्हास सांगू इच्छितो.

मी कोल्हापूरकरच. तेच कोल्हापूर जे सार्-यांना आपलेसे करतं. माझी मायभूमी म्हणजे कोल्हापूर. खुप दिवसांनी आज पून्हा परतीचा प्रवास. खरेच कामावरून परत आपल्या राहत्या घरी जाणार, आज पुन्हा आपल्या सवंगडयांना, आपल्या जवळच्या माझ्या माणसांना भेटणार या भावनेनेच, मन एकदम उत्साहाने फुलून आले.
जीवनात काहीतरी करून दाखवायच्या जिद्दीने मी सुद्धा कामाच्या शोधात भरपूर फिरत असतो. त्या दिवशीही मी असेच बाहेर गावाहून परतीचा प्रवास करत होतो. भरपूर दिवस घरापासून, आपल्या माणसानं पासून दूर राहिल्या मुळे, कधी एकदा घरी पोचतो असे झाले होते. कधी एकदा सर्वाना भेटतो हीच इच्छा मनाला लागून राहिली होती. जे बाहेर गावी राहतात, त्यांना हीच ओढ मनाला लागून राहिलेली असते. लहानपणीचे ते दिवस आठवले की मन अगदी भरून येत.



तो डाव मांडणे आणि पूर्ण दिवस भर, उन्हात उनाडक्या करणे यातच दिवस संपायचा. कदि झाडावरून आंबे तोडून पळून जाणे तर कधी विहिरीत इर्षे वर अगदी टोका वरून उड्या मारणे. खरच काय दिवस होते ते. आता फक्त काम आणि काम. आजकाल तर, या मोबाइल च्या जगात सर्व काही मोबाइल मधेच होते. पण आपल्या तरुण पीडिला हे कळत नाही की जोपर्यंत व्यायाम करत नाही तोपर्यंत आपल्या शरीराची रचना नीट राहत नाही.

जाऊदे मूळ गोष्टी वर येऊ. नाहीतर आठवणी कितीही काढली तरी ती संपत नाही.

तर् मित्रांनो, परवाच मी परतीचा प्रवास करत होतो. ती वेळ होती प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशीची. प्रजासत्ताक दिन शुक्रवारी असल्यानं बऱ्याच लोकांना शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस सुट्या दिल्या होत्या.त्यामुळे बस स्थानकावर खूप गर्दी. काहींना तर जागाच मिळेना. शेवटी खूप याचने नंतर, बस मधून उभे राहून येण्याची परवानगी मिळाली तेही पूर्ण तिकीट काडूनच.

मला कधीही रात्रीचा प्रवास करायला आवडतो. उन्हाची दगदग नसते आणि गर्दीही कमी असते. रात्री नउ चा ठोका होता. भूक तर खूप लागली होती. पण बसची वेळ झाली होती म्हणून बिस्कीट वर वेळ मारुन नेली. आमची गाडीही इतक्यातच भरली आणि मार्गाला लागली.

हिवाळा चालू होता, म्हनून जास्तच ठंडी पडली होती. याच ठंडीत बस कोल्हापूर बस स्थानकावर पोचली तीही पहाटे आडीच च्या पहारास.

कोल्हापुरातून घर थोड्या अंतरावर असल्याने मी पुढच्या बसची वाट पाहत राहीलो. तीही बस साडे पाच ला होती म्हणून मीही बस स्थानकावर फिरत राहीलो.

बस स्थानकावर येणाऱ्या जाणाऱ्यांची अफाट गर्दी सुटली होती. सगळ्या प्रवाशांनी एकच अक्रोश केला होता, या कापत्या थंडीला दूर करायला एकच कप चहाचा प्याला. कित्येक जणांनी शेकोटी पेटवल्या होत्या. ठंडी पासुन अगदी तात्पुरत्या सूटका  व्हावी म्हनून.

बस स्थानकावर पाहतो तर काय, अगदि अडीच वाजल्यापासूनच पोहे, चहा आणि नाष्टा तयारच होता. एवढ्या कडाक्याच्या थंडीत, रात्रभर जागून प्रयत्नांची पराकाष्ठा करने हे मला तर कधी उभ्या आयुष्यात जमले नसते. खरेच या प्रयत्नांना २१ तोफांचा सलाम.

इतक्या जबरदस्त थंडीत आमचे तर हात पाय कापायला लागले होते पण इतके असून पण, पूर्ण तयारी करून रात्रभर जागरण करून, पूर्ण खाद्य पदार्थ बनवणे तेही काही चेष्टा नाही भाऊ. आमचे दोन्ही हात खिशात थंडी सहावेना.

अगदी प्रत्येक जण दोन तीन वेळा चहा घेत होता. बस इतकेच बोलायचे होते. या मेहनतीला दाद मिळायला हवी. माहीत आहे असे वाटते की अर्धा विषय आपण बोललो. काही तरी शिलक ठेऊ, पुढच्या वेळी साठी. कोल्हापूर मध्ये अशी ही सुंदर पहाट मी कधीच पहिली नव्हती. तर चला मित्रांनो परवानगी द्यावी.

मित्रांनो शब्दांची मांडणी अवडलली असेल तर हा ब्लॉग subscribe करा आणि खाली comments मधे नवीन विचार सुचवा.

Latest article

पपीता पत्ती का रस: डेंगू के इलाज में एक प्राकृतिक उपाय

पपीता पत्ती का रस: डेंगू के इलाज में एक प्राकृतिक उपाय पपीता पत्ती परिचय डेंगू बुखार, मच्छरों से फैलने वाली एक खतरनाक बीमारी है, जिससे कई...