।...वेडं प्रेम...।
मनात तू ,
कल्पनेत तू ,
वाऱ्याच्या मंद स्पर्शात तू,
मग का वेगळी झालीस ग तू...!
सुखात तू दुखत तू,
माझ्या वेड्या मनाचा ध्यास तू,
माझ्या प्रेमवेड्या हृदयातील धक धक तू,
इतके असून पण का वेगळी झालीस तू...!
अंतःकरण तुटले माझे,
तीळ तीळ मन जळले माझे,
आता काही उरले नाही,
जवळ तू राहिली नाही...!
काय करावे कळेना आता
कोणाशी काय बोलावे,
उमजेना आता,
खरच काही कळत नाही,
का डाव मोडलिस तू,
जोड जमायच्या आदी,
मनाला माझ्या विरहात टाकलीस तू...
खरेच, हेच होते का ग प्रेम,
याच साठी दिलास का वेळ,
गेलीस तू सोडून,
नातं सगळे तोडून...!
पण आठवण तर येतच राहील,
मनाच्या कोपर्यात, हृदयाच्या कप्प्यात,
तुझी जागा तशीच राहील...!
...प्रशांत सुरेश देवमोरे…!
...प्रशांत सुरेश देवमोरे…!