मंडळी रामराम...!
कसं काय .... बरं हाय न्हवं...!☺☺☺
तुम्ही म्हणाल आज सूर्य काय पश्चिमेला उगवला वाटतें!
असच समजा...!
खरे तर सकाळची वेळ आहे. नुकतंच सूर्याने पण आपले दर्शन देत पूर्ण पृथ्वी प्रकाशमय केलीयं. असच सकाळचं कोवळं ऊन खात बसलोय म्हणा.
हा पक्षांचा किलबिलाट, सकाळचं कोवळं ऊन, स्वछ आणि थंडगार वारे, सगळे काही अंगावर शहारे आणत होते.
म्हणून, या सकाळच्या स्वछंद वातावरणात मन खूप प्रफुल्लित झालं. याच नयनरम्य दृश्याचा आनंद घेत असतानाच, मनात एक गोष्ट घर करून बसली. ती म्हणजे एक उनाड दिवस. असे वाटत राहिले की त्यावर आपल्याला काही तर लिहले पाहिजे.
एक उनाड दिवस.
तसे म्हटले तर लहानपणी सगळेच दिवस उनाड होते, नाही का! लहान मूलं बघा काशी खेळतात, कुणाचे काही अडले की काय झाले, काही बगायचे नाही... सगळे आपल्याच धुंदीत... किती मज्जा असायची.
ही गोष्ट वाचताना सुध्दा तुम्हाला पण असेच वाटत असेल ना ... एक उनाड दिवस हा मिळायला हवाच. बरे का, एक उनाड दिवस म्हणजे रविवारची सुट्टी न्हवे. दिवस कुठलाही असो पण त्या दिवशी आपण स्वतः ला विसरून, बाकी लोकांना विसरून मनाला पूर्ण लहान पोरासारखे बनवून टाकायचे आणि फक्त झिंगाट करायचा... तो म्हणजे एक उनाड दिवस.
एकदम मन असं उत्तुंग आनंदाने भरभरून आलं पाहिजे...
आतूनच असे वाटले पाहिजे की ... एक उनाड दिवस ...
प्रत्येकयाच्या जीवनात हा उनाड दिवस हा येतच राहतो . पण कोण होकारार्थी आणि कोण नकारात्मक घेतो.
माझ्या बाबतीतही असे घडते कधी कधी...
जसे की कितीतरी वरश्याने "तिचा" फोन आला. मन पूर्ण भांबावून गेलं. काय करायचं काय कळेना. मी फोन उचलला, एकदम शांतता, आणि तिकडून आवाज आला, "कसा आहेस, इतके दिवस माझी आठवण नाही अली का...!" हा निरागस आवाज मनाला पूर्ण कलाटणी देणारा होता.
मी काय उत्तर देऊ मलाच कळेना. काही समजेनाच झालं.
मी म्हणालो, "असे नाही गं, आठवण तर प्रत्येक क्षणाला येते, पण...!" असे म्हनताच, डोळ्यात टचकन पाणी भरले!
पण काय? तिचाही आवाज थोडा मंदावला, आणि तीही थोडी नर्व्हस झाली.
कॉलेज संपल्यावर तब्बल पाच वर्षे आमची भेट नव्हती.
ती तरी काय बोलणार. पण ती प्रेमाची ओढ मात्र तशीच होती...!
मी म्हणालो, काय गं, बऱ्याच दिवसांनी फोन केलास.? सगळे काही बरे आहे ना?
ती म्हणाली "खूप आठवण येते तुझी" पण मी काही करू शकत नव्हते.
ठीक आहे. असे म्हणताच ती म्हणाली "आपण भेटूया का?"
तिला भेटणार...ह्या विचारानेच माझा तर आनंद गगनात मावेना.
मी पटकन हो म्हटले. टीतूनच आमची तयारी चालू. आता तयारी कसली असे विचारू नका? नाही म्हणजे नवीन कपडे, बूट, नवीन केसांची style केली पायजे. जरा देखणं दिसायला पाहिजे ना...!
काय आहे जेव्हापासून नोकरी लागली तेव्हापासून स्वतः वर लक्षच दिलं नाही. ते जाऊदे.
भेटन्यासाठी आमची जय्यत तयारी चालू झाली, फोन वर फोन झाले, कुठे अन कसे भेटायचे याची जुळणी चालू झाली...!
आणि...आणि तो दिवस उजडला...। आता ती भेटणार म्हणून मन आतुरतेने वाट पाहू लागले.
तिला भेटण्यासाठी मन अतृप्त झाले होते. पहाटे पहाटे मी स्टेशन वर उभा होतो. थंड खूप होती. थंडीने हात कापत होते.
तितक्यातच ती येण्याचा भास झाला. काय करणार मनात तिचाच विचार होता. ती कधी येईल, ती आता काय बोलेल माझ्याशी, आता ती कशी दिसत असेल?
खूप प्रश्न पडले होते. माझी नजर मात्र स्टेशन च्या entry gate वर टक लावून होती.
आणि तीतून कुणी तरी येताना दिसले. पहाट होती त्यामुळे नेमका उजेड नव्हता. पण तरीही मी टक लावून पाहत होतो.
आणि ती तीच, ती आली... माझ्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य आले. ती आली पूर्ण चादर अंगावर ओढवून, पाठीवर एक पिशवी, हात घट्ट बांधून ती आली न माझ्यासमोर उभी राहिली.
दोघेही एकमेकांना पाहत राहीलो, काही बोलण्यासाठी ओठच उघडेनात. डोळ्यातुन मात्र अश्रू ओघळत होते. तिने क्षणाचाही विचार न करता घट्ट मिठी मारली, आणि खूप रडली.
ती खूप खुश ही होती पण गेली 5 वर्षे आम्ही भेटलो नाही म्हणून खूप रडली.
मलाही रडू आवारत नव्हते, पण मी तिला सांभाळत म्हटले,

वर्षांनी खूप भेटण्यास तुला ,
मन आतुरतेने वाट पाहते,
देखने दिसण्यास आणि तुझ्या हृदयात बसण्यास मात्र,
मन जुळवा जुळव करू पाहते....।
हे माझे प्रेमाचे बोल ऐकून ती म्हणाली,
तुझा माझा सहवास,
जसा अत्तराचा वास,
दूर राहणे तुझ्याविना,
जसा मासा पाण्याविणा...।
मी म्हटले,
तुझ्या सहवासातले ते गोड दिवस,
निघून गेले सर सर,
आठवण येताच मात्र,
डोळ्यातून अश्रू येतात झर झर...!
आठवण येताच मात्र,
डोळ्यातून अश्रू येतात झर झर...!
खुप वर्षाने आम्ही भेटलो, खुप आनंद झाला.