पर्यावरण…
हे तर सर्वांनीच ऐकले असेल. आपला खरा मित्र, निसर्ग जो आपल्यास जगण्यासाठी भरपूर मदत करतो.
मी तर म्हणतो पर्यावरण म्हणजे ‘परीचे आवरण’. हो असेच वाटते मला. हा हिरवागार परिसर, वेगवेगळ्या रंगांनी भरलेला आहे. पाने, फुले, पक्षी, झाडे, प्राणी, नदी, तलाव, धबधबा आणि भरपूर काही. हे काही एका, परिपेक्षा कमी नाही.
हे हिरवी झाडे, रंगबिरंगी फुले आणि छाती पुढे टाकून, तटस्थ उभा असणारा तो डोंगर, वेगवेगळे ऋतू, रिमझिम पाऊस, धुंद होऊन पिसारा फुलवून नाचणारा मोर; ही वाऱ्याची मंद झुळूक,त्यावर डोलणारी झाडे…! हे सगळे दृश्य एकदम मन प्रफुल्लित करते, नाही का? म्हणून मी म्हणतो आपल्या सभोवताली परीचे आवरण आहे म्हणून “पर्यावरण”.
किती छान असतो हा पावसाळा. थेंब थेंब पडतो, पण सगळ्यांना, जुन्या आठवनी कडे घेऊन जातो. आजही भरपूर लोक पाऊस पडला की मस्त गरम गरम भाजी खातात. पाऊस पडताना भजी खाण्याची मजा काही अगळीकच.
पृथ्वी बनवणार्याने किती छान असा निसर्ग बनवला आहे. सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करून आवश्यक असे सर्व काही निर्माण केले आहे. आपल्या जगण्यासाठी सर्व मदत हा निसर्ग करतो. जसे की हवा, पाणी, अन्न हे सर्व काही आपण या निसर्गाकडून घेतो. पण परतफेड म्हणून आपण काय देतो. किंबहुना, हे जणून घ्या, की आपण या पर्यावरणाला परत देण्याइतपत मोठे नाही!
फक्त काळजी घेऊ शकतो. तेही आपण नाही करत. इतका मोठा निसर्ग, मनाने पण खूप श्रीमंत आहे. तो आपल्या कडे मागतही काहीच नाही. फक्त इतकेच सांगतो की, काळजी घ्या.
पण, आपण काय करतो …. विध्वंस, ऱ्हास या सगळ्याचा.
जरा विचार करा, आपली जरा प्रकृती बिघडली की लगेच वैद्यकीय उपचार घेतो. हा निसर्ग कोणाकडे जाणार. त्याचा वैद्य कोण? कोण करणार उपचार या पृथ्वीवर वसलेल्या निसर्गाचे? पडला ना प्रश्न!
आपण, स्वतः चांगले दिसण्यासाठी बरेचकाही करतो, भरपूर पैसेही खर्च करतो. पण जो आपल्याला अन्न, पाणी, हवा या जीवनावश्यक गोष्टी देतो, आपण त्याची काळजीच घेतं नाही. आपले आई वडील आपली काळजी घेतात, प्रियकर प्रेयसीची काळजी घेतो, नोकरदार आपल्या मालकाची काळजी घेतात, पण कोणच या निसर्गाची कदर करत नाही. जितके याला लुटता येईल तेवढा लुटतो. आजचा माणूस किती स्वार्थी आहे हो…! हो ना?
जरा विचार करा, निसर्ग प्रदूषित होत चालला आहे, हवा पाणी दूषित होत आहे, रोगराई वाढत आहे, समुद्राची पाण्याची पातळी वाढत आह.
आपण हा दूषित निसर्ग आपल्या येणाऱ्या पिढीला देणार आहोत का? कदाचित येणाऱ्या या प्रदूषनामुळे पुढची पिढी अपंगच या दुनियेत येतील. त्यांच्यासाठी, हा खरेच केवळ त्यांच्यासाठीच आपणास काळजी घ्यावी लागेल… या निसर्गाची, प्रेयसी प्रमाणे प्रेम करावे लागेल, या मुक्या निसर्गावर… तेही तात्काळ, या क्षणापासून. कदाचित येणाऱ्या पिढीला हा निराळा, निसर्ग बागायला मिळणार ही नाही.
मित्रानो जागे व्हा, अजूनही वेळ गेलेली नाही. येणाऱ्या काळात आपण सदृढ राहणार असाल तर आता आपल्याला निसर्गाची मदत करावी लागेल, थोडा वेळ द्यावा लागेल. नाहीतर, तुम्हाला माहीतच आहे, निसर्ग खवळला की तो कुणालाही सोडत नाही! तो कुणाचा धर्मही पाहत नाही. तो फक्त संपवून टाकतो. तेही एका क्षणार्धात!
त्यासाठी, प्रदूषण करणाऱ्या गोष्टी वापरू नका, झाडे लावा - हवा स्वच्छ होईल, पुरापासून सवरक्षण मिळेल, पाणी जिरवा - भुतालची पाण्याची पातळी वाढेल, जमीन थंड राहण्यास मदत होईल.
आता आला आहे पावसाळा,
धरा ध्यास मनाला,
एक संग व्हा आता,
झाडे लावा आणि पाणी जिरवा,
मदत होईल निसर्गाला,
निसर्गही परतफेड करील आपल्याला...।
असे हे रंगबिरंगी जग,
नाही भेटणार दुसरे,
निसर्ग सौंदर्य परत मिळवण्यासाठी,
गरज आहे सध्या एकजुटीची,
मदत होईल निसर्गाला,
निसर्गही परतफेड करील आपल्याला...।
प्रशांत सुरेश देवमोरे
जर लेख आवडला असेल तर मित्रानो subscribe करा...