नुसती आठवण जवळ ठेऊन,
त्रास सहायला, नाही मला नाही झेपत…!
काही गौम्य नसतानाही,
वेळ खर्च करण्यात,
मला नाही पटत…!
हेही माहीत आहे,
आठवणी काढल्या तर,
क्षण किती सुंदर होते...
पण,
त्या सुंदर आठवणींच्या परिकल्पना जोपासणे
हेही नाही झेपत…!
शेवटी आठवण ही आपलीच असली,
तरीही, ती सत्य बनून पुढे येणार्यातली नाही,
म्हणून, त्यात मौल्यवान असा काळ हातातून गमालयास,
माझ्या व्यवहार ज्ञानाला झेपत नाही…!
खरे आहे सगळे,
खूप छान होता वेळ,
त्यात तुझ्या गोड सहवासाने,
खेळला होता खूप खेळ…!
पण तो होता …
आणि ….आता तो नाही,
तो परत मिळवण्यासाठी,
अर्थ व प्रयत्न लागले कमी,
का आणि कसे,
कळेना काही,
आता ह्या मैदान मोकळ्या आयुष्यात,
प्रेम तर राहिल मनातच ...
पण मैदान सोडणे,
आपल्या जन्मदात्याला खपणारे नाही,
आपण असतानाही त्यांच्या नयनी अश्रु देखील शोभणारे नाहीत,
म्हणून...जीवनाचा हा गाडा न्यायचा आहे शेवटपर्यंत,
प्रेम होते आणि ते राहील ही ,
पण सहवास राहणार नाही शेवटपर्यंत,
राहतील त्या फक्त आठवनी….
म्हणून म्हणतो,
सारखी आठवन काडू नकोस,
त्रास मनाला देऊ नकोस,
पुढे चालत राहा तू,
तुझेही आयुष्य जगत राहा तू,
नवीन उमेद, नवी स्वप्ने पाहत राहा तू,
कुठे ना कुठे तरी होईलच टक्कर,
तेव्हा, ठरवू आठवणींचे हे चक्कर...
विचारू जाब एकमेकांना,
आठवनीत हरपणे छान होते,
कि प्रेम मनी असने छान होते,
...प्रशांत सुरेश देवमोरे…!